खासदारकी रद्द करणं म्हणजे..., राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं भाष्य

खासदारकी रद्द करणं म्हणजे…, राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं भाष्य

| Updated on: Mar 24, 2023 | 3:53 PM

राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा आणि खासदारकी रद्द याचं कनेक्शन काय? पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं काय सांगितलं?

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून संसद भवनातून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी कारवाई झाली ते सूडाचं राजकारण आहे. नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरले आहेत, यामुळे त्यांनी अघोषित आणीबाणी लागू केली आहे. काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांना मिळत असलेली लोकप्रियता पाहला त्यांचा आवाज बंद करण्यासाठी हा प्रयत्न झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सूरत कोर्टाने साध्या मानहानीच्या खटल्यात 2 वर्षाची शिक्ष सुनावली. तर एखाद्या संसद सदस्याची खासदारकी रद्द करण्यासाठी त्याला 2 वर्षांची शिक्षा होणं आवश्यक असतं. त्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली, त्याच वेळेला सरकारच्या डोक्यात काय सुरु होतं, याचा अंदाज आम्हाला आला होता, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.

Published on: Mar 24, 2023 03:52 PM