... म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय; अजित पवारांच्या वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला

… म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय; अजित पवारांच्या वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला

| Updated on: May 09, 2024 | 5:41 PM

शरद पवार आमचे दैवत आहे, पण आता ८० व्या वर्षी शरद पवारांनी थाबंलं पाहिजे असंही अजित पवारांनी म्हटले. तर कुणाला काही मिळालं. याचा हिशोब तुम्हीच करा असं वक्तव्य करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विधानावर पलटवार केलाय. तर अजित पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा खोचक टोला

मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती पण मी शरद पवार यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं असून त्यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे. अजित पवार पुढे असेही म्हणाले की, शरद पवार आमचे दैवत आहे, पण आता ८० व्या वर्षी शरद पवारांनी थाबंलं पाहिजे असंही अजित पवारांनी म्हटले. तर कुणाला काही मिळालं. याचा हिशोब तुम्हीच करा असं वक्तव्य करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विधानावर पलटवार केलाय. तर अजित पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक टोला लगावला आहे. “अजित पवारांना आणखी काय संधी मिळायला पाहिजेत होती. त्यांच्या इतकी संधी महाराष्ट्रामध्ये कोणालाही मिळाली नाही. त्यांनी अनेक वेळेला राजीनामा दिला. पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीबरोबर शपथ घेतली. तरी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद दिले. त्यांना आणखी काय व्हायचंय? पंतप्रधान व्हायचं असेल तर शरद पवार करू शकत नाहीत”, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

Published on: May 09, 2024 05:41 PM