नव्या संसद भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नकोच; ‘या’ काँग्रेस नेत्याचं ट्विट चर्चेत
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला काँग्रेस नेत्याचा विरोध, कुणाचं सुचवलं नाव?
नवीदिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन येत्या रविवारी होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोध केला आहे. राहुल गांधी यांनी ‘नए संसद भवन का उद्घाटन राष्ट्रपति जी को ही करना चाहिए, प्रधानमंत्री को नहीं!’, असे ट्वीट केल्यानं एकच चर्चांना उधाण आलं आहे. तर राहुल गांधी यांनी ट्विट करत हा विरोध केला असून नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे, असेही सुचवले आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी याबाबतची माहिती दिली होती. मात्र, मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या होणाऱ्या उद्घाटनाला राहुल गांधींनी विरोध दर्शवला आहे.