राहुल गांधी यांना खासदारकी बहाल, आता पुन्हा सरकारी निवासस्थान मिळणार?

राहुल गांधी यांना खासदारकी बहाल, आता पुन्हा सरकारी निवासस्थान मिळणार?

| Updated on: Aug 07, 2023 | 2:16 PM

VIDEO | राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाल्यानंतर त्यांचा मुक्काम पुन्हा तुघलक लेनवरच्या निवासस्थानी होणार?

नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३ | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी अनेक वर्षांपासून ते ज्या निवासस्थानी राहत होते, ते तुघलक लेनवरचं निवासस्थान त्यांना सोडावं लागलं होतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयानं मोठा निर्णय घेतला असून त्यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकी बहाल झाल्यानंतर त्यांचा मुक्काम पुन्हा तुघलक लेनवरच्या निवासस्थानी होणार असल्याचे सांगितले जात आहे. या निवासस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरात कडेकोड बंदोबस्त पाहायला मिळायचा. मात्र राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानतंर त्यांना हे घर सोडावं लागलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे निवासस्थान बंद अवस्थेत होते. यानंतर राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी वास्तव्यास गेले होते.

Published on: Aug 07, 2023 02:16 PM