राहुल गांधी पहिल्यांदाच ‘मातोश्री’वर जाणार? या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलणार?
VIDEO | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लवकरच भेट; एकत्र लढणार?
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असून या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भेटीची तारीख गुलदस्त्यात असून या राजकीय भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राहुल गांधी मातोश्रीवर दाखल होत जर त्यांनी खरंच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीने उद्धव ठाकरे यांचं राजकीय वजनही ठरवले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.