काँग्रेस नेत्या सोनिया अन् प्रियंका गांधी यांचा लोकसभेसाठी मतदारसंघ ठरला, कुठून लढवणार निवडणूक?

काँग्रेस नेत्या सोनिया अन् प्रियंका गांधी यांचा लोकसभेसाठी मतदारसंघ ठरला, कुठून लढवणार निवडणूक?

| Updated on: Jan 31, 2024 | 3:02 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तेलंगणामधून लोकसभा निवडणूक लढवणार तर प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली.

मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसमधून एक मोठी बातमी आहे. हिमाचल प्रदेशातून गांधी कुटुंबातील एका व्यक्तीला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तेलंगणामधून लोकसभा निवडणूक लढवणार तर प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली. दरम्यान, सोनिया गांधी 5 वेळा लोकसभेच्या खासदार आहेत. सध्या त्या रायबरेलीच्या काँग्रेसच्या खासदार आहेत. अलिकडच्या काळात प्रकृतीच्या कारणास्तव त्या दैनंदिन राजकीय कामांपासून लांब होत्या. त्यांनी राज्यसभेच्या जागेसाठी होकार दिल्यास प्रियंका रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? हा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Published on: Jan 31, 2024 03:01 PM