44 MLA असतानाही 106 आमदार असलेल्यांच्या बरोबरीचं काम : Vijay Wadettiwar | Nagar Panchayat Election

| Updated on: Jan 20, 2022 | 5:36 PM

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण भाजपने आपलं वर्चस्व वाढवलं होतं. पण आता ते कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपपेक्षा मोठा पक्ष हा काँग्रेस राहिला आहे. विदर्भ जेव्हा ताकदीने काँग्रेसच्या बरोबर उभा राहत असतो तेव्हा सत्तांतर होत असते.

मुंबई : कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जसे निकाल अपेक्षित होते तसे आले आहेत. 106 आमदार बरोबरीचं काम राज्यात झालं आहे. कुणी छाती बडवून घेत असेल तर त्यांना लखलाभ असो. चार नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याची स्थिती आहे. आमदारांच्या तुलनेत आम्ही चार नंबर वरच आहोत. पण आजचे निकाल आल्यावर आम्ही पण दोन नंबरच्या बरोबरीने आहोत, हे स्पष्ट होईल, असंही वडेट्टीवार यांनी ठासून सांगितलं. ते म्हणाले, ग्रामीण भागात काँग्रेसचं वर्चस्व होत आणि राहील हा संदेश सुद्धा जनतेने दिला आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण भाजपने आपलं वर्चस्व वाढवलं होतं. पण आता ते कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपपेक्षा मोठा पक्ष हा काँग्रेस राहिला आहे. विदर्भ जेव्हा ताकदीने काँग्रेसच्या बरोबर उभा राहत असतो तेव्हा सत्तांतर होत असते.