‘मला निवडणुकीत भाजपची ऑफर…’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा अन्…
काँग्रेसच्या एका बड्या नेत्याकडून राजकीय घडमोडी घडत असताना एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. काय म्हटलं बघा व्हिडीओ?
काँग्रेसच्या एका बड्या नेत्याकडून राजकीय घडमोडी घडत असताना एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ‘मला २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ऑफर होती.’, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. तर मी एक निष्ठावान कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी म्हणत कोणताही पक्ष बदलणार नाही, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ज्याला सत्तेचा लोभ अशीच माणसं पक्ष बदलत असतात, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हणत विरोधकांनावर निशाणा साधक खोचक टोला लगावला आहे. ‘मला जायचं असतं तर मी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी गेलो असतो. मला २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ऑफर होती. पण मी पुरोगामी विचारांचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा मी कार्यकर्ता म्हणून जगतोय.’, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला. तर ‘ज्याला सत्ता संपत्ती याचा लोभ आहे. त्याशिवाय ते जगू शकत नाही. तीच लोकं वारंवार पक्ष बदलत असतात आणि वारंवार निष्ठा बदलत असतात.’, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

'खोक्या'चा गेम ओव्हर, सतीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर

'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल

सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?

आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
