हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

| Updated on: May 05, 2024 | 3:22 PM

'हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कोणत्याही अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर...'

हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवादी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. हेमंत करकरे यांना लागलेली गोळी आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याची होती, असं धक्कादायक वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत त्यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला आहे. तर हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कोणत्याही अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर देशद्रोह्याला पाठिशी घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी करत जोरदार भाजपवर हल्लाबोल केला आहे. पुढे त्यांनी असेही म्हटलंय की, एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊनच मी म्हटलं आहे. हे चुकीचं नाहीये. त्यांच्या पुस्तकाच्या आधारावर मी हे म्हटलंय. यात जर 50 टक्के असत्य असेल तर 50 टक्के सत्य असेल ना? ती बाजू का मांडली नाही? मी मनाचं बोलत नाहीये. मुश्रीफ यांनी लिहिलं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Published on: May 05, 2024 03:18 PM