‘महाराष्ट्र विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदेंचं नाव सर्वात वर…’, कोणी केला मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल?
उद्याचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल तेव्हा महाराष्ट्र विकणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची इतिहासात नोंद होईल, असं काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. बघा विजय वडेट्टीवार यांनी काय केली जिव्हारी लागणारी टीका?
महाराष्ट्र विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदेचं नाव सर्वात वर असेल, असं वक्तव्य करत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस तिकडे फडफड करत आहे.’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर विजय वडेट्टीवार यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘अजित पवार यांच्याबाबत भाजपने वापरा आणि फेका नीती वापरली आहे’. महाराष्ट्रात सत्तेच्या खुर्चीत राज्य विकणारी मंडळी बसलेली आहेत. कुपंनच शेत खातंय. हे महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. कधी नव्हे एवढ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने जमिनी विकण्याचा सपाटा लावलाय. हा महाराष्ट्र विकणारा मुख्यमंत्री कोण असेल तर उद्याचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल तेव्हा महाराष्ट्र विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदेचं नाव सर्वात वर असेल, असे वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी टीकास्त्र डागलंय.