‘राज्यात साठमारी आणि लूटमारी सुरू’; अधिवेशनाच्याआधी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेत्याचा सरकारवर पलटवार
यानंतर दिवसभरासाठी कामकाजा तहकूब करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी सत्ताधारी सरकारला शेतकरी प्रश्न आणि विधान परिषद उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांच्यावर कोंडी केली.
मुंबई, 17 जुलै 2023 | शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरूवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर दिवसभरासाठी कामकाजा तहकूब करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी सत्ताधारी सरकारला शेतकरी प्रश्न आणि विधान परिषद उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांच्यावर कोंडी केली. मात्र याच्याआधी अधिवेशानाच्या पुर्वसंधेला आयोजित चहापानच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल करताना टीका केली होती. त्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी, टीका करताना, विरोधक गोंधलेले आहेत अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली होती. पण अशी भूमिका मांडणारेच सत्ताधारीच गोंधळलेले आहेत. काल चहापाण्याच्या कार्यक्रमात चहा पिताना नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हते, एकमेकाकडे बघत नव्हते. याचाच अर्थ हे सरकार जनतेला काय न्याय देईल.