मुख्यमंत्र्यांची नव्हे तर अजितदादांची 'लाडकी बहीण', 'त्या' जाहिरातीवरून विजय वडेट्टीवारांचा सणसणीत टोला

मुख्यमंत्र्यांची नव्हे तर अजितदादांची ‘लाडकी बहीण’, ‘त्या’ जाहिरातीवरून विजय वडेट्टीवारांचा सणसणीत टोला

| Updated on: Sep 04, 2024 | 2:16 PM

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 'मुख्यमंत्री' हा शब्द वगळून तिथे 'दादाचा वादा' अशी टॅगलाईन वापरण्यात आली असून लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवारांच्या पक्षाकडून कऱण्यात आलेल्या जाहिरातीत महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळून ‘अजित पवारांची लाडकी बहीण योजना’ असा उल्लेखही करण्यात आला आहे. यावरूनच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीसह अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तिजोरी लुटण्यात आणि श्रेयवाद घेण्याची लढाई महायुतीमध्ये सुरू आहे. आता मतांसाठी महायुतीतील तिनही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे. लाडकी बहीण हे केवळ एक सोंग आहे. महायुतीत पुतणा मावशीचं प्रेम आहे. त्यापद्धतीने महायुतीत सुरू आहे. त्यांची वास्तविकता केवळ या लाडकी बहीणच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतं कशी मिळतील, या श्रेय वादाच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे व्यस्त आहेत, असे वडेट्टीवार म्हणालेत. तर पुढे ते असेही म्हणाले, शासनाची योजना, जनतेचा पैसा मात्र अजित पवार यांचा प्रचार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे सरकारी तिजोरीतील आहेत. दादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून योजना चालवत आहे का? असा सवाल करत काँग्रेसने अजितदादांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.

Published on: Sep 04, 2024 02:16 PM