महाराष्ट्रात भाजपचं पानिपत होणार, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काय दिला इशारा?
VIDEO | लोकसभा निवडणुकीसाठी मविआतील जागावाटपावर काँग्रेसच्या बड्या नेत्याचं भाष्य, म्हणाले...
नागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा आम्ही लढविल्या तेवढ्याच जागा आगामी लोकसभा निवडणुकीत लढवणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊत यांच्या दाव्यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या घरी झालेल्या महविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस हायकमांड आदेशानुसार महविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिल्यानं त्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. संजय राऊत यांनी जो १९ चा फॉर्म्युला सांगितला तसा कोणता निर्णय झाला नाही याबाबत तिनही पक्ष ठरवतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले तर भाजपला वाटतंय महाविकास आघाडीची युती होऊ नये, असाच त्यांचा प्रयत्न सुरुये. कोणी किती आणि कुठं लढवणार याला काही अर्थ नाही. महविकास आघाडी म्हणूनच आम्ही समोर जाऊ. तर महाराष्ट्रात भाजपच पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.