'मविआ'मध्ये मुख्यमंत्री कोण? विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं...

‘मविआ’मध्ये मुख्यमंत्री कोण? विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं…

| Updated on: May 22, 2023 | 12:54 PM

जिसकी जितनी संख्या भारी...; विजय वडेट्टीवार यांनी सांगितला मविआतील मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला

नागपूर : महाविकास आघाडीत निवडणुकीच्या जागा वाटपावरून चांगलीच चर्चा सध्या सुरूये. अशातच महाविकास आघाडीतील सर्वच नेते जास्त जागांवर आपला दावा करत आहे. यासगळ्यात लहान भाऊ मोठा भाऊ यावरून चर्चांना उधाण आलंय तर नागपुरात भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचं बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असेल तरी जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सदरी हा फॉर्म्युला आघाडी, युतीमध्ये आहे. समर्थकांना बॅनर लावण्याचा अधिकार आहे. आपला नेता मोठा व्हावा ही भावना असते त्यामुळे बॅनर लावतात, असे त्यांनी सांगितले. तर मविआमध्ये ज्यांचे जास्त खासदार आमदार असतील त्यांच्यात मुख्यमंत्री होईल असेही त्यांनी थेट म्हटले. लहान भाऊ मोठा भाऊ या वादात आम्हाला पडायचं नाही. कोण लहान भाऊ मोठा भाऊ यापेक्षा पहिले तिन्ही भावांनी मिळून शेती चांगली करू. उत्तम नांगरणी करुन पीक चांगलं येईल यासाठी आधी प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतीचा हंगाम चांगला करण्यासाठी चांगलं काम करून पीक आल्यावर कशी वाटणी करावी हे ठरवू, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

Published on: May 22, 2023 12:54 PM