Vijay Vadettiwar : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, वडेट्टीवारांनी लगावला टोला; ‘कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली अन्…’
संभाजी भिडे यांना कुत्र्यांने चावा घेतल्यानंतर तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी भिडे गुरुजी यांना 2 इंजेक्शन दिलेले आहेत. आणखी 4 इंजेक्शन त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी समोर आली. सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री 11 वाजता ते घराबाहेर पडले. त्यावेळी माळी गल्ली भागातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने गुरूजींच्या पायाला चावा घेतला. यानंतर त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या घटनेवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुत्र्याला कुठून दुर्बुधी सुचली…कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही. आता कुठला कुत्रा पोलीस शोधत आहेत, याची माहिती अजून कळली नाही पण मी माहिती घेतो’, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याच्या घटनेवर भाष्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला, यासंदर्भात खरंतर एसआयटी वैगरे लावून चौकशी केली पाहिजे’, असंही म्हणत विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
