‘हिम्मत असेल तर लावा ईडी’; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं विरोधकांना खुल चॅलेंज…

| Updated on: Aug 27, 2023 | 11:15 AM

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेतील अनेक नेत्यांवर गेल्याकाही वर्षापासून ईडीची कारवाई होत आहे. तर ईडीच्या कारवाईमुळेच अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना तुरूंगात जावं लागलं होतं. तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई होईल अशी चर्चा सुरू आहे.

अमरावती : 27 ऑगस्ट 2023 | महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आणि त्यांच्या आधी राज्यात ईडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेतील नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना तरूंगात जावं लागलं आहे. तर अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यावर देखील ईडीकडून कारवाई केली जात आहे.

त्यामुळेच अजित पवार गट हा भाजप सोबत गेला अशी टीका केली जात आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी ईडीवरून खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. तर थेट भाजपला आव्हान दिलं आहे.

यावेळी यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना, लावा ना ईडी हिम्मत असेल तर लावा.. मी भीत नाही बिलकुल लाव ईडी. बघतो काय निघतं असा हल्लाबोल केला आहे. तर माझ्यावर ईडी लावण्यासाठी निवेदन देण्यात आली असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. दरम्यान यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे.

Published on: Aug 27, 2023 11:15 AM
मुख्यमंत्री शिंदे यांच्या परभणी दौऱ्याआधीच ग्रामस्थांचं अनोखं शोले स्टाईलने आंदोलन; नेमकं कारण काय?
‘तुम्ही वैज्ञानिकांना विसरता आणि प्रत्येक ठिकाणी’; चंद्रयान-3 वरून राऊत यांचा मोदी यांना टोला