काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी? काँग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर रवींद्र धंगेकर यांचाच फोटो नाही

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी? काँग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर रवींद्र धंगेकर यांचाच फोटो नाही

| Updated on: Oct 08, 2023 | 4:03 PM

VIDEO | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक सुरू आहे. जिल्हानिहाय होत असलेल्या बैठकीच्या निमित्त लावलेल्या बॅनरवर ग्रामीण मधील आमदार थोपटे आणि जगताप यांचा फोटो मात्र रवींद्र धंगेकर यांचा नाही?

पुणे, ८ ऑक्टोबर २०२३ | पुण्यात काँग्रेसच्या बॅनरवर रवींद्र धंगेकर यांचा फोटो लावण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच कुजबुज सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक सुरू आहे. जिल्हानिहाय होत असलेल्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांचा देखील सहभाग आहे. पुणे ग्रामीण मधील आमदार थोपटे आणि जगताप यांचा या काँग्रेसच्या बैठकी निमित्त लावलेल्या बॅनरवर फोटो आहे मात्र रवींद्र धंगेकर यांचा या बॅनरवर फोटो दिसत नसल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे. या बॅनरवरून होणाऱ्या चर्चेमुळे आता काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. इतकेच नाही तर अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

Published on: Oct 08, 2023 04:03 PM