Special Report | कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार केआर रमेश कुमार (KR Ramesh Kumar) यांनी महिलांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भर विधानसभेत के आर रमेश कुमार यांनी ज्यावेळी बलात्कार रोखता यत नसेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं अत्यंत निंदनीय वक्तव्य केलं आहे.
Congress MLA Ramesh Kumar Statement बंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार केआर रमेश कुमार (KR Ramesh Kumar) यांनी महिलांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भर विधानसभेत के आर रमेश कुमार यांनी ज्यावेळी बलात्कार रोखता यत नसेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं अत्यंत निंदनीय वक्तव्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी (Vishweshwar Hegde Kageri) यांनी याचा निषेध करण्याचऐवजी त्या वक्तव्यावर जोरजोरात हसू लागले होते.
विधानसभेत नेमकं काय घडलं?
कर्नाटकात महापुरामुळं झालेल्या शेतीच्या आणि पिकाच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्याची मागणी आमदारांकडून सुरु होती. यावेळी सभागृहात गदारोळ सुरु होता. विधानसभा अध्यक्षांनी यावेळी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष हेगडेयांनी रमेश कुमार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. ‘रमेश कुमार तुम्हाला माहितीचं आहे की या परिस्थितीचा मला आनंद घ्यायला पाहिजे, मी ठरवलंय आता मी कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही चर्चा करा,असं हेगडे म्हणाले. यावर उत्तर देताना काँग्रेस आमदार रमेश कुमार यांनी विधानसभेत म्हटलं की, ‘एक म्हण आहे….ज्यावेळी बलात्कार रोखता येत नाही त्यावेळी झोपून राहावं आणि आनंद घ्यावा, अशीच स्थिती आज निर्माण झालीय.