कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत, प्रणिती शिंदे असं का म्हणाल्या; बघा व्हिडीओ
पहिली टर्म असल्याने रोहित पवार यांच्यात पोरकटपणा, त्यांना थोडा वेळ द्या म्हणजे..., नेमकं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याबाबत विधान केले होते. यावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची भाष्य करत रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. सोलापूर लोकसभेतील जागेबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे रोहित पवार यांनी दावा केला होता. कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत. त्यांची पहिली टर्म आहे. त्यांच्यात अजून पोरकटपणा आहे. त्यांना थोडा वेळ द्या मॅच्युरिटी येईल, असे वक्तव्य करून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी खोचक टीका केली आहे.
Published on: Feb 10, 2023 03:06 PM
Latest Videos