काल वडिलांचं निधन, चंद्रपूरातील काँग्रेसचे एकमेव खासदार यांची प्रकृती चिंताजनक
VIDEO | नागपूरहून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने थेच दिल्लीला उपचारांसाठी रवाना, प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट आली समोर
चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली असून चिंताजनक आहे. काल बाळू धानोरकर यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना एयर अॅम्बुलन्सद्वारे नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. याआधी त्यांच्यावर नागपुरात खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या 8 वर्षांपूर्वी त्यांनी स्थूलतेची शस्त्रक्रियादेखील केली होती. 2 दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना स्वादुपिंडात इन्फेक्शन झाले. त्यावर अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून बाळू धानोरकर यांना किडनी आणि इतर आजारांनी ते त्रस्त होते. त्यामुळे त्यांना नागपूरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांच्यावर एकशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्याचं इन्फेक्शन त्यांना झालं होते. यानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांकडून खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कालच बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचं निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.