Varsha Gaikwad : …म्हणून रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला, वर्षा गायकवाड यांनी सांगितलं कारण
'रवी राजा यांच्याशी आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. पण इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून ते का गेले माहीत नाही. काँग्रेसने त्यांना सगळं काही दिलं. महापालिकेत विरोधी पक्षनेते पद दिलं. इतर महत्वाची पदं दिली. पण तरी देखील ते भाजपमध्ये गेले हे दुर्भाग्यपूर्ण आहे', असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते, माजी नगरसेवक रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे. रवी राजा धारावीमधून कसे लढले असते? ती जागा एससी आहे. त्यांना सायनची जागा हवी होती. ती जागा न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. जो योग्य उमेदवार होता. त्याला ही जागा देण्यात आलीये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. रवी राजा यांना कोवीड काळात ज्या नोटीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आहे. भीतीपोटी काँग्रेस सोडली. पक्षाने त्यांना खूप सन्मान दिला, महत्त्वाची पदं दिलीत आणि एक तिकीट नाही मिळालं म्हणून पक्ष सोडणं. अयोग्य आहे. पक्षाने खूप दिलंय त्यामुळे पक्षाने एकनिष्ठ राहिलं पाहिजे. काँग्रेसमध्ये कुठलेच अंतर्गत कलह नाहीत. मुंबई काँग्रेसमध्ये योग्य पद्धतीने काम सुरू आहे. काहीजण नरेटीव्ह पसरविण्याचं काम करत आहेत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.