'तरूणांचं भविष्य उद्धवस्त करण्याचा सरकारचा विडा', कुणाची टीका?

‘तरूणांचं भविष्य उद्धवस्त करण्याचा सरकारचा विडा’, कुणाची टीका?

| Updated on: Sep 29, 2023 | 11:18 PM

VIDEO | कंत्राटी भरतीच्या जाहिरातीवरून पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं नायब तहशीलदार आणि कारकून पदाची जाहिरात काढली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे, बघा काय म्हणाले?

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | नायब तहसीलदार आणि कारकून पदही आता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं जाहिरात काढली आहे. दरम्यान यावरून वाद होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तर याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय. यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी ट्वीट करून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. ‘शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्थ केल्यानंतर आता अधिका-यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदार व नायब तहसिलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तात्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.’

Published on: Sep 29, 2023 11:18 PM