VIDEO : Congress Protest | मुंबईत हँगिंग गार्डन परिसरात काँग्रेसचं आंदोलन, भाई जगताप पोलिसांच्या ताब्यात
मुंबईमध्ये महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत हँगिंग गार्डन परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. भाई जगताप पोलिसांच्या ताब्यात सध्या आहेत.
मुंबईमध्ये महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत हँगिंग गार्डन परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. भाई जगताप पोलिसांच्या ताब्यात सध्या आहेत. केंद्र सरकारने वाढवलेल्या जीएसटी कराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना त्याचबरोबर इंधन दरवाढ. महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ वाढवलेल्या जीएसटीविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
Published on: Aug 05, 2022 12:58 PM
Latest Videos