प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी, ईडीच्या कारवाया यांविरोधात दिल्लीत मोठं आंदोलन सुरू केलं आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी, ईडीच्या कारवाया यांविरोधात दिल्लीत मोठं आंदोलन सुरू केलं आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी दिली नव्हती. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. राहुल गांधी हे काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकात रोखलं आणि त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं.
Latest Videos