‘दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण…’, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संताप आणि रोष पसरला आहे. यावरुन विरोधकही आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे. त्यातच आता राहुल गांधींनीही टीकास्त्र डागलं आहे
सांगलीच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधींनीही यावरुन भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, आज लढाई विचारधारेची आहे. देशात पाहत आहात. पूर्वी राजकारण व्हायचं. आज भारतात विचारधारेचं युद्ध सुरू आहे. एकीकडे काँग्रेस आणि आपले महापुरुष, दुसरीकडे भाजप. आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं. पण त्यांना काही लोकांचा फायदा करायचा आहे. दलित दलित राहिले पाहिजे, मागास मागास राहिले पाहिजे. आदिवासी आहे तसेच राहिले पाहिजे. जातीची चौकट राहिली पाहिजे असं त्यांना वाटतं, असे म्हणत राहुल गांधींनी नाव न घेता निशाणा साधला तर त्यांना द्वेष पसरवायचा आहे. हिंसा भडकवायचे आहे. एका धर्माला दुसऱ्याच्याबद्दल भडकवत आहेत. मणिपूर सिव्हिल वॉर सारखं झालं आहे. दीड वर्ष झाले पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत. जाऊच शकत नाही. कारण भाजपच्या लोकांनी तिकडे आग लावली, असे म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला.