…तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; बावनकुळे यांचा राहुल गांधी यांना इशारा

| Updated on: Mar 25, 2023 | 3:30 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.

मुंबई : काँग्रेसचे अपात्र खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा नव्हे तर, संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपच्या राज्यासह देशातील भाजप नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्यावरून राज्यातही भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.

राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा नव्हे तर, संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला. यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर आल्याचे बावनकुळे म्हणाले. तसेच कोर्टाचा निर्णय राहुल गांधींनी मान्य केला म्हणून त्यांची खासदारकी गेली. मात्र जनतेचा कोर्टात त्यांनी माफी मागीतलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत ते माफी मागच नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे ते म्हणाले.

Published on: Mar 25, 2023 02:50 PM
नवी मुंबईच्या वाशी खाडीकिनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचं मनमोहक दृश्य
राहुल गांधी यांना घरचा आहेर मिळालाय, आता माफी मागा; भाजप आमदार आक्रमक