Special Report | पोटनिवडणूकीचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा ?
महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला असून शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात प्रवेश केला आहे.
शिमला: हिमाचलप्रदेशमध्ये विधानसभेच्या तीन आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड विजय झाला आहे. काँग्रेसने या चारही जागेवर भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. नागरिकांच्या असंतोषामुळेच भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागल्याचं सांगितलं जात आहे. हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या क्लिन स्वीपमुळे भाजपच्या तंबूत चांगलीच खळबळ उडाली आहे. दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला असून शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला राज्याबाहेरच्या राजकारणात बळ मिळेल काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. तर वाढती महागाई, भाजपविरोधातील रोष आणि कलाबेन यांना असलेली सहानुभूती यामुळे भाजपचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.