रिश्ते में तो हम तुम्हारे बाप... शिंदे गटाच्या माघार घेण्यावर 'या' नेत्याचा खोचक टोला

रिश्ते में तो हम तुम्हारे बाप… शिंदे गटाच्या माघार घेण्यावर ‘या’ नेत्याचा खोचक टोला

| Updated on: Oct 10, 2023 | 6:56 PM

VIDEO | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी यासाठी दिलेला अर्ज मागे घेण्यासंदर्भात शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर हे मुंबई पालिकेला पत्र देणार आहेत. त्यामुळे आता शिंदे गटानं माघार घेतल्याची टीका विरोधकांकडून होतेय. यावर 'या' नेत्यानं लगावला खोचक टोला

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी यासाठी दिलेला अर्ज मागे घेण्यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे पालिकेला पत्र देणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार हे नक्की झाले आहे. दरम्यान, शिंदे गटानं माघार घेतली असल्याची खोचक टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील शिंदे गटाला टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची सत्ता आहे म्हणून शिंदे गटानं शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेतला असता तरी त्यात जिवंतपणा दिसला नसता, रिश्ते में तो हम तुम्हारे…असं म्हणत अतुल लोंढे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर मेळावा झाल्यानंतर आपला पोपट होऊ नये, म्हणून शिंदे गटानं ही माघार घेतल्याची खोचक टीकाही अतुल लोंढे यांनी केली आहे.

Published on: Oct 10, 2023 06:56 PM