‘छगन भुजबळ महाराष्ट्रातील सर्वात कमी बुद्धीचा माणूस’, कुणी काढली भुजबळ यांची अक्कल?
VIDEO | छगन भुजबळ महाराष्ट्रातला कमी बुद्धीचा माणूस आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे फक्त नाव घ्यायचे परंतु त्यांचे साहित्य वाचायचे नाही, दाखला देत छगन भुजबळ यांच्यावर कुणी केली सडकून टीका?
सोलापूर, २२ ऑगस्ट २०२३ | सावित्रीबाई फुले यांनी शाळेला सरस्वतीचा दरबार असे वर्णन केल्याचा दाखला देत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी सडकून टीका केली आहे. छगन भुजबळ महाराष्ट्रातला कमी बुद्धीचा माणूस आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे फक्त नाव घ्यायचे परंतु त्यांचे साहित्य वाचायचे नाही. छगन भुजबळ चुकीचा इतिहास सांगत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या ‘काव्य फुले’ या कवितासंग्रहात शाळेला सरस्वतीचा दरबार असे वर्णन केले आहे. तुम्ही एकीकडे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं साहित्य नाकारताय का..? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. छगन भुजबळांचे मंत्रीपद काढून घेण्याबाबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांचा अभ्यास कमी आहे. महाराष्ट्रच्या राजकारणात त्यांचा किती अभ्यास आहे, त्यांची डिग्री काय याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. फुले कुटुंबीयांचं साहित्य नाकारण्याचं पाप छगन भुजबळ करत आहेत. प्रथमता त्यांचा धिक्कार करतो, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.