काँग्रेसकडून Nagpur मनपा निवडणुकीची तयारी सुरु, Devendra Fadnavis यांच्या मतदारसंघात बैठकीचं सत्र

| Updated on: Jul 24, 2021 | 6:44 PM

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिलेय.

नागपूर : काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नागपूर महानगरपालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पण ही सत्ता उलथलण्यासाठी काँग्रेसने जोर लावलाय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिलेय. पहिल्या दिवशी नागपूरातील तीन विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकांचं नियोजन करण्यात आलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे.