…म्हणून ‘मविआ’च्या वज्रमूठ सभेला नाना पटोले गैरहजर, चर्चांना उधाण
VIDEO | संभाजीनगरच्या 'मविआ'च्या वज्रमूठ सभेला नाना पटोले गैरहजर, काय आहे कारण?
संभाजीनगर : महाविकास आघाडीची राज्यातील सर्वात मोठी संयुक्त अशी जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे नेते मंडळी हजर झाले आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि जयंत पाटील, तर काँग्रेस तर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर राहणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले सभेला हजर राहणार नाहीत. अचानक नाना पटोले सभेला येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण नाना पटोले यांचं न येण्यामागील कारणही समोर आलं आहे. नाना पटोले यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव नाना पटोले या सभेला अनुपस्थित राहणार आहेत.