‘शरद पवार यांच्या राजीनाम्याचा ‘मविआ’वर फरक पडणार नाही’, ‘या’ नेत्यानं थेट सांगितलं
VIDEO | 'शरद पवार हे अनुभवी नेते पण शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून राजीनामा का दिला? याचे कारण सांगणे अवघड'
मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केला. यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. ‘शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून राजीनामा का दिला? याचे कारण सांगणे अवघड आहे. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता आहेत. त्यांच्या अनुभवाचा नेहमीच राष्ट्रवादीला झाला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर कोणताही फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं आहे. महाराष्ट्राने नेहमी तशीच भूमिका घेतली आहे. पवारांनी या विचारांना मानून नेहमी काम केले आहे. जो राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय असेल, जो अध्यक्ष होईल तो मविआसोबत राहील’, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. तर अजित पवार संदर्भातील बातम्या मीडियातून येत होत्या त्यानंतर ही निवृत्ती घेतली याबाबद्दल आता फार बोलू शकत नाही. कारण निवृत्तीचा कारण माहीत नाही. ज्या विचारसरणीने पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला. त्याच विचारसरणीने हा पक्ष आमच्यासोबत पुढे जाईल. हा त्यांचा पक्षातील मामला आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नसल्याचेही नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले.