राज ठाकरे हद्दपार, तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण…, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
राज ठाकरे यांचं पत्र व्हायरल होतंय यात त्यांनी काँग्रेसला मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार करा, असं म्हटलंय. यावर पटोले म्हणाले, राज ठाकरे स्वतःच हद्दपार झालेत, ते दुसऱ्यांना काय हद्दपार करणार, तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण जनतेत त्यांचं काय? असा सवाल करत पटोलेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला
आज राज ठाकरे आणि मोदी हे एकाच मंचावर दिसणार आहे, यावर काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवाल केला असता ते म्हणाले, ‘या सभेने काहीच परिणाम होणार नाही. ठाकरे-ठाकरे, पवार-पवार यांच्या वाद निर्माण करून देणं ही भाजपची स्टाईल आहे. पण राज्यात केंद्रात त्यांचे सरकार असताना बळीराजाबद्दल कोणी बोलत नाही.’ तर राज ठाकरे यांचं पत्र व्हायरल होतंय यात त्यांनी काँग्रेसला मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार करा, असं म्हटलंय. यावर पटोले म्हणाले, राज ठाकरे स्वतःच हद्दपार झालेत, ते दुसऱ्यांना काय हद्दपार करणार, तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण जनतेत त्यांचं काय? असा सवाल करत पटोलेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर भाजप आणि मोदींच्या रोड शोवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मोदी घाबरलेले आहेत. घाबरलेला माणूस जेव्हा खूप वेळा खोटं बोलतो, कधी म्हणतात मुस्लिमांच्या घरी खीर खाल्ली तर कधी म्हणतात हे वोट जिहाद आहेत. घाबरलेल्या व्यक्तीसारखं रोज वागायचं तसे हे वागताय..इतकंच नाहीतर ते मुंबईकरांना वेठीस पकडायचं.. मोदींनी रोड शो केला तेव्हाही त्यांनी कायदा तयार केला. मेट्रो बंद केल्यात. ट्राफिक जाम केलं…मुंबई सारख्या शहराची काय हालत होणार हे देखील पतंप्रधान पदावरील व्यक्तीला कळू नये, असे म्हणत नाना पटोले यांनी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. तर घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर मोदींना त्यांचा रोड शो टाळता आला असता, पण त्या घटनेत कोणाचा जीव गेला यापेक्षा आमची खुर्ची महत्त्वाची आहे, असे म्हणत पटोलेंनी मोदींवर हल्लाबोल केलाय.