मोदी महानटसम्राट… काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका, बघा काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील सर्वात मोठ्या नेटवर्क TV9 ला महामुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी मोदींना थेट सवाल केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे कुटुंबाबरोबर असलेल्या राजकारणापलीकडच्या संबंधांबद्दल भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानटसम्राट आहे. मोदी केव्हा काय बोलतील. कधी डोळ्यातून अश्रू टाकतील, कधी हसतील? जेव्हा नोटबंदी झाली. जनता आपल्या घामाचा पैसा काढण्यासाठी रांगेत उभे राहिले तेव्हा मोदी जपानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत होते, मी देश कसा केला हॆ सांगत होते. त्यामुळे मोदी हे मोठे नटसम्राट आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते बोलण्यामागील मोदींचा हेतू काय? हे कुणालाच लवकर लक्षात येत नाही तर वेळेवर आपण सत्तेत येणार की नाही? अशी भिती सध्या मोदींच्या मनात निर्माण झाली असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. ‘आम्ही मागच्या निवडणुकीत आमने-सामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे.’, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी टीव्ही ९ च्या मुलाखतीत म्हटलं होतं. यावर नाना पटोलेंनी पलटवार केलाय.