केंद्रासह राज्य सरकार नापास ! काँग्रेस नेत्यानं सरकारचा निकालच लावला, काय केले गंभीर आरोप?
VIDEO | विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरु, सरकारविरोधात हाय कोर्टात जाणार असल्याचा दिला इशारा
मुंबई : विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना नाना पटोले म्हणाले, या दोन्ही सरकारने फक्त विकासाच्या गप्पा मारल्या आहेत. त्यामुळे ही दोन्ही सरकार राज्यात आणि केंद्राच्या प्रश्नांवर नापास झाल्याचे म्हटले. या सरकारकडून नवीन घोषणा दरवेळी करताना पाहायला मिळत आहे, मात्र त्या पूर्ण होत नाही. या सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना गुलाम बनविण्यासाठी तीन काळे कायदेही या सरकारने आणले आहेत. तर नमो शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली असली तरी त्याचा काडीमात्र फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे या सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस पाहायला मिळत अशी सडकून टीकाही त्यांनी सरकारवर केला आहे. केवळ विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे या सरकारविरोधात आम्ही यांच्याविरोधात हाय कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.