राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर नाना पटोले म्हणताय…
VIDEO | राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनवाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला, तसेच राहुल गांधींना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या 9 वर्षांपासून मोदी सरकार देशात राज्य करतेय. ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या हे लोक देशातील जनतेचे लाखो, हजारो कोटी रुपये घेऊन पळाले. त्यांना मदत करण्याच काम मोदी सरकार करतेय, असा आरोप नाना पटोले यांनी केला