सत्तेत राहून दुसऱ्या धर्माला मारायचं हीच भाजपची प्रवृत्ती, कुणाचा जोरदार हल्लाबोल
VIDEO | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याभेटीनंतर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र यावे हीच काँग्रेसची भूमिका, असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर सत्तेत राहून दुसऱ्या धर्माला मारायचं हीच भाजपची प्रवृत्ती असल्याचेही त्यांनी म्हणत भाजपवरही यावेळी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘सत्तेत राहून दुसऱ्या धर्माला मारायचं आणि तिसऱ्या धर्माला जिवंत ठेवायचं. महाराष्ट्रात असताना गाय ही आई आणि महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर गाय खाऊ, अशी नकली हिंदुत्व प्रवृत्ती भाजपची आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत कुणाचा पाचोळा होणार हे जनताच ठरवेल. मुख्यमंत्र्यांनी जास्त घाई करू नये,’ असा आव्हान थेट निवडणुका लावा मग कळेल असा इशाराही नाना पटोले यांनी विरोधकांना दिला आहे.