मॅच फिक्सिंग कोण करतंय? अंगावर आलं तर…नाना पटोले यांचा रोख नेमका कुणाकडे?
निवडणुकीत जे मॅच फिक्सिंग करणारे होते, त्यांना माझा त्रास होत होता. काँग्रेस एका खासदारावर कसे पोहचले. मला कोणावर आरोप करायचे नाही, परंतु मला अंगावर घेणाऱ्यांना मी शिंगावर घेणार, असे म्हणत नाना पटोले यांनी थेट इशारा दिला. नाचता येत नाही अंगण वाकडं काही लोकांना वाटतं. काही लोक पक्षाच्या भरवश्यावर कुटुंब चालवत असतात. असेही त्यांनी म्हटले.
मुंबई, १ मार्च २०२४ : राज्यात काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहचले आहे. त्यानंतर काँग्रेस पराभूत होत होते. मी सूत्र घेतल्यानंतर राज्यात काँग्रेसकडे नव्हत्या, त्या जागा आम्ही जिंकल्या. माझ्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळात विजय मिळवला. तर निवडणुकीत जे मॅच फिक्सिंग करणारे होते, त्यांना माझा त्रास होत होता. काँग्रेस एका खासदारावर कसे पोहचले. मला कोणावर आरोप करायचे नाही, परंतु मला अंगावर घेणाऱ्यांना मी शिंगावर घेणार, असे म्हणत नाना पटोले यांनी थेट इशारा दिला. पुढे ते असेही म्हणाले की, सत्तेची मानसिकता ठेवणारी लोकं आणि काम करणारी लोकं यातला फरक दिसत आहे. कोण गेला याचा काही फरक पडत नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, कसब्याची असेल त्या भाजपच्या ताब्यात होत्या. त्या आम्ही जिंकल्या आहेत. एखाद्या पक्षाचं मूल्यांकन करायचं असेल तर निवडणुका हेच थर्मामीटर आहे. त्यात काँग्रेस जिंकत आहे. त्यामुळे कोण जातं हा मुद्दा नाही. आमच्या अंगावर जो येईल त्याला कसं शिंगावर घ्यायचं हे आम्हाला माहीत आहे. नाचता येत नाही अंगण वाकडं काही लोकांना वाटतं. काही लोक पक्षाच्या भरवश्यावर कुटुंब चालवत असतात. ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या काँग्रेसकडे नव्हत्या. त्या आम्ही जिंकल्या. कारण आम्ही हरणाऱ्या जागाही जिंकल्या आहेत. तर मॅच फिक्सिंग कसं व्हायचं ते योग्यवेळी साांगेल. अंगावर आलं तर शिंगावर घेईल, असे म्हणत नाना पटोले यांनी थेट इशाराच दिलाय.