Special Report | नाना पटोलेंना कॉंग्रेसची साथ नाही? -TV9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण हे आंदोलन पोलिसांनी मध्येच अडवलं.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण हे आंदोलन पोलिसांनी मध्येच अडवलं. यावेळी पोलिसांनी हे आंदोलन न करण्याची विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली. पटोले यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने आहे त्या ठिकाणीच रस्त्यातच आंदोलन सुरू केलं. बराच वेळ आंदोलन केल्यानंतर अखेर हे आंदोलन थांबवत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं. मात्र, आजचं आंदोलन थांबलं असलं तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने सागर बंगल्यावरील आंदोलन थांबवलं असलं तरी भाजपच्या कार्यालयांवर होणारं आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही पटोले यांनी आज स्पष्ट केलं.