काँग्रेसचा उमेदवार आज रात्रीपर्यंत फायनल? काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेसचा उमेदवार आज रात्रीपर्यंत फायनल? काय म्हणाले नाना पटोले?

| Updated on: Feb 05, 2023 | 1:30 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाना पटोले यांना फोन, तरीही पटोले म्हणतात, कसब्यातून निवडणूक लढणार; कारण सांगितले काय?

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन करून कसब्यातून उमेदवार न देण्याचे आवाहन केले आहे. तरीही आम्ही कसब्याची जागा लढवणार आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ‘मला कसब्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली होती. कुटुंबातील कोणी जातो तर आपण ती जागा बिनविरोध निवडून देतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण कसब्यातील तो वाद संपला आहे.’ असे त्यांनी म्हटले तर कसब्यातून भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवार दिला नाही. त्यामुळे परंपरेचा मुद्दाच निकाली निघाला असून आम्ही कसब्याची जागा लढवणार आहोत, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही कसब्याची तयारी करत आहोत. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. पक्ष अध्यक्ष म्हणून मी या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. आज रात्रीपर्यंत उमेदवार फायनल होईल आणि उद्या अर्ज भरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Published on: Feb 05, 2023 01:29 PM