Vijay Wadettiwar Video : ‘चार महिन्यापासून सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय, ‘त्या’ मंत्र्याला…’, नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
नागपूर शहरात देखील औरंगजेबाच्या कबरीवरून काल चांगलाच वाद पेटला. या मुद्द्यावरूनच नागपूर शहरात काल रात्री दोन गट आमने सामने आलेत आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यावर वडेट्टीवारांनी भाष्य केले.
नागपूरला अशांत करण्याचं काम कुणी केलं? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर गेल्या चार महिन्यापासून एक मंत्री वळवळ करतोय, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर वळवळ करणाऱ्या मंत्र्याला आवर घालण्याची गरज होती, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. काल नागपुरात झालेल्या राड्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘नागपूर सारख्या शांत शहरात जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे. गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे, त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली असती’. पुढे ते असेही म्हणाले, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे, यासाठी जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, नागपुरात झालेल्या दोन गटातील राड्यानंतर नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं.

लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर

नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर

कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू

'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
