'मविआ'त नेमकं चाललंय काय? काँग्रेसकडून लोकसभेच्या सर्वच जागांची चाचपणी

‘मविआ’त नेमकं चाललंय काय? काँग्रेसकडून लोकसभेच्या सर्वच जागांची चाचपणी

| Updated on: May 29, 2023 | 2:23 PM

VIDEO | काँग्रेसकडून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात चाचपणी, कारण नेमकं काय?

नागपूर : अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीची बैठकही झाली आहे. काँग्रेस राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागांची चाचपणी करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची 2 आणि 3 जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची ही बैठक होत आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघातंही काँग्रेसची चाचपणी होणार आहे. या चाचपणीच्या आधारेच काँग्रेस महाविकास आघाडीत जागा मागणार असल्याची चर्चा आहे.

Published on: May 29, 2023 02:23 PM