Nana Patole | किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी काहीही फरक पडत नाही : नाना पटोले

Nana Patole | किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी काहीही फरक पडत नाही : नाना पटोले

| Updated on: Nov 07, 2021 | 7:44 PM

सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते यांच्यावरदेखील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीला लक्ष्य करत आहेत.  याआधी सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते यांच्यावरदेखील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आता काँग्रेस किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तशी माहिती दिलीय. सध्या सोमय्या यांनी बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ( मल्टिस्टेट) मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी 53.72 कोटी रुपयांचे मनी लॉंडरींग केल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय.