सगळ्यांना पुरुन उरणार..., विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांची सोशल मिडीयावर पोस्ट काय?

सगळ्यांना पुरुन उरणार…, विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांची सोशल मिडीयावर पोस्ट काय?

| Updated on: Apr 09, 2024 | 3:44 PM

तिकीट नाकारल्यानंतर सांगलीतील विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर समर्थक गोळा झाले असून ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबत सगळ्यांना पुरुन उरणार...,आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढणार..

विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट नाकारल्यानंतर सांगलीतील विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर समर्थक गोळा झाले असून ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबत सगळ्यांना पुरुन उरणार…,आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढणार… या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत. काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त करणे सुरु केले आहे. ‘आमचे काय चुकले, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात’, अशी पोस्ट कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकत आहेत. शिवसेनेला सांगलीची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर सांगलीतली काँग्रेस आता चांगलीच आक्रमक झालेली आहे. विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकत्रित येत महाविकास आघाडीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्याचबरोबर विशाल पाटील आगे बढो, अशी घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे. विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची आग्रही मागणी केल्याचेही पाहायला मिळत आहे.

Published on: Apr 09, 2024 03:44 PM