Jaipur | महागाईविरोधात कॉंग्रेसचा एल्गार, सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी

| Updated on: Dec 12, 2021 | 4:46 PM

या रॅलीत बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही यावेळी उपस्थित होत्या. जयपूरच्या विद्यानगर स्टेडियममध्ये ही रॅली सुरू आहे. रॅलीच्या भोवती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मोठे मोठे पोस्टर लावले होते.

जयपूर: देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा. देशात पुन्हा हिंदुंची सत्ता आणा, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं. जयपूर येथे काँग्रेसने महारॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या रॅलीत बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही यावेळी उपस्थित होत्या. जयपूरच्या विद्यानगर स्टेडियममध्ये ही रॅली सुरू आहे. रॅलीच्या भोवती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मोठे मोठे पोस्टर लावले होते. तसेच रॅलीला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेला एहेत. 2014मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहे. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचं आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.