नाशिककरांनो काळजी घ्या ! शहरात डोळ्यांची साथ अन् 156 रुग्ण; डॉक्टरांचं काय आवाहन?
VIDEO | नाशिक शहरात नेत्र संसर्गाचे 156 रुग्ण, काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन, कशी घ्याल काळजी?
नाशिक, 29 जुलै 2023 | नाशिक शहरात सध्या डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जवळपास 300 हून अधिक रुग्णांनी तपासणी केली. सद्यस्थितीत नाशिक शहरात डोळ्यांच्या आजाराचे 156 रुग्ण असल्याची माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी दिली. यात सर्वाधिक रुग्ण दहा ते वीस वर्ष वयोगटातील आहे. डोळ्यांचा आजार हा चार ते पाच दिवसात बरा होणारा असल्याने घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच डोळ्यांना वारंवार हात लावू नये, स्वतःचे टॉवेल-कपडे वेगळे ठेवावे, लहान मुलांना शाळेत पाठवू नये, अशा खबरदारीच्या सूचना देखील वैद्यकीय विभागाने दिल्याय.
Published on: Jul 29, 2023 04:29 PM
Latest Videos