चंद्रभागा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य; चंद्रभागेच्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधी अन् भाविकांचं आरोग्य धोक्यात

चंद्रभागा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य; चंद्रभागेच्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधी अन् भाविकांचं आरोग्य धोक्यात

| Updated on: Jun 13, 2023 | 5:01 PM

VIDEO | चंद्रभागा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य, वारकरी अन् भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली चंद्रभागा नदीची सध्या दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात सापडली आहे. आषाढी यात्रा तोंडावर असताना ही नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सध्या नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. अशा घाण पाण्यातच भाविक पवित्र स्नान करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २९ जूनला आषाढी एकादशी वारी असल्याने राज्यभरातील भाविक, वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. मात्र पंढरपुरात दाखल झाल्यानंतर वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करून मगच विठुरायाचं दर्शन घेत असतात मात्र या नदीची अवस्था गंभीर असल्याने इथे येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 13, 2023 05:01 PM