विजय शिवतारेंची पुढची भूमिका काय? बारामतीत पवारांविरोधात निवडणूक लढवणार की नाही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंची समजूत काढल्याचेही सांगण्यात आले होते. तर लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी दिली होती.
मुंबई, २० मार्च २०२४ : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून लोकसभा लढणवार असा निर्धार शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी व्यक्त केला होता. मात्र यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विजय शिवतारे यांना त्यांनी भेटीसाठी बोलावले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंची समजूत काढल्याचेही सांगण्यात आले होते. तर लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी दिली होती. त्यानुसार उद्या विजय शिवतारे हे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. उद्या साडे १० वाजता शिवतारे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे आता नेमका कोणता निर्णय ते घेता याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.