कंत्राटी भरतीवरून भाजप v\s काँग्रेस आमने-सामने, विरोधकांकडून चिखलफेक सुरुच
tv9 Marathi Special report | कंत्राटी भरती आघाडी सरकार तसंच उद्धव ठाकरे यांचं पाप असल्याची टीका करत देवेंद्र फडवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआरच रद्द केला. मात्र त्यावरुन भाजपनं माफी मांगो आणि जोडे मारो आंदोलन अशी 2 आंदोलन झालीत. कुठे आलेत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा फडणवीसांनी केली. मात्र त्यावरुन सुरु झालेली राजकीय चिखलफेक काही थांबलेली नाही. तर दुसरीकडे कंत्राटी भरती रद्द झाली खरी पण अडीच लाख रिक्त पदं कधी भरणार हाही प्रश्न समोर आहे. कंत्राटी भरती आघाडी सरकार तसंच उद्धव ठाकरेंचं पाप असल्याची टीका करत फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआरच रद्द केला. मात्र त्यावरुन 2 आंदोलन झालीत. भाजपनं माफी मांगो आणि जोडे मारो आंदोलन केलं. तर काँग्रेसनं जल्लोष आंदोलन केलं. पण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकाचवेळी आल्यानं कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. संभाजीनगरच्या क्रांती चौकात सुरुवातीला भाजपनं आंदोलन करत महाविकास आघाडीचा पुतळा जाळला. मात्र त्याचवेळी चौकाच्या दुसऱ्या बाजूला जल्लोष आंदोलनासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले. आंदोलनावेळी घोषणाबाजीमुळं भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं.