राज्यात ३ हजार पोलीस कंत्राटी पद्धतीनं? विधीमंडळात विरोधक आक्रमक अन् सत्ताधाऱ्यांना सवाल

राज्यात ३ हजार पोलीस कंत्राटी पद्धतीनं? विधीमंडळात विरोधक आक्रमक अन् सत्ताधाऱ्यांना सवाल

| Updated on: Jul 26, 2023 | 8:03 AM

VIDEO | 3 हजार पोलिसांची कंत्राटी भरती? कंत्राटी पद्धतीवरुन विधीमंडळात विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यातील पोलीस विभागात ३ हजार पोलीस कंत्राटी पद्धतीनं भरती होण्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या मुद्द्यावरून विरोधक विधीमंडळात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झालेला असताना आता राज्यातील पोलीस विभागात कंत्राटी पद्धतीने भरती होणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी पोलिसांची गरज आहे. तर इतर धार्मिक सणांच्या काळात अतिरिक्त पोलिसांची आवश्यकता भासते, त्यामुळे कंत्राटी पद्धतीन भरती करण्याचा आग्रह असल्याची माहिती आहे. राज्य सरकारकडून ७ हजार ७६ शिपाई आणि ९९४ वाहन चालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरती प्रक्रिया आणि शिपायांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन मनुष्यबळ दाखल होण्यास २ वर्षाचा कालावधी लागणार असल्याचेही सांगितले जात आहे. बघा या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 26, 2023 07:54 AM